Thu. Apr 2nd, 2020

दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे कॉपी

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

जळगावच्या आर आर शाळेतला एसएससी परीक्षेतला कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दहावीच्या भूमिती आणि विज्ञान विषयात विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. संस्थाध्यक्षांनीच हा प्रकार चव्हाट्यावर आणलाय.

विद्यार्थ्यांना कॉपी करता यावी यासाठी शिक्षकांकडून वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरे कापड टाकून झाकण्यात आले. मात्र, त्यातील एका कॅमेऱ्यावरील कापड खाली पडल्याने विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचा सगळा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *