Sun. Aug 18th, 2019

सांगली- जळगाव मतदान प्रक्रिया पूर्ण, इतकचं झालं मतदान…

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जळगाव तसेच सांगली-मिरज-कुपवाड या दोन महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. सांगलीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. तर जळगावमध्ये 45 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मतदारांचा कौल कोणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत तिरंगी लढत – 

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या २० प्रभागांमधील ७८ जागांसाठी हे मतदान होत आहे. त्यासाठी एकूण ७५४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

सकाळी साडे सात वाजल्यापासून सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील सर्वच मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. यंदा मतदारांचे स्वागत गुलाब पुष्पांनी करण्यात आल्याने प्रसन्न वातावरणात मतदानास सुरवात झाली.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

जळगाव महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपा यांच्यात प्रमुख लढत – 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार नशिब आजमावत आहेत. शहरातील ४६९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून १४६ उपद्रवी मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्य शासनाच्या नव्या नियमावलीनूसार एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून देण्यात येणार आहे.

तर दोन्ही महापालिकाक्षेत्रात या निवडणुकांसाठी एकूण ७ लाख ८९ हजार २५१ मतदार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी १०१२ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *