Jaimaharashtra news

…अन् वाढदिवसाची तारीखच ‘त्याच्या’ मृत्यूची तारीख बनली

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतल्याची घटना जळगावात घडली आहे.  27 वर्षीय योगेश भोरे याचा धबधब्याखाली मृत्यू झाला आहे. 

 

योगेश हा चाळीसागावातील हिरापूर रोडवरील ग्रामशक्ती फायनान्स कंपनीचा कर्मचारी होता.  

 

21 जुलैला त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त रविवारी सुट्टी असल्याने कामावरील जवळपास 10 मित्रांसमवेत चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात

असलेल्या पितळखोऱ्या जवळील धवलतीर्थ कुंड धबधब्या जवळ फिरायला गेला होता.  

 

योगेश धबधब्याच्या पाण्याच्या धारेखाली बसलेला असताना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पाण्याचा प्रवाह जोरात आल्याने तो कुंडात पडला आणि त्याच्या डोक्याला

जबर मार लागला. त्यामुळे योगेश पाण्यातील खोल कुंडात बुडाला. कुंडात खोल पाणी असल्यामुळे तो लवकर सापडला नाही.

 

पोलीस, ग्रामस्थ, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुंळे रविवारी संध्याकाळी ‘त्याचा’ मृतदेह सापडला.

Exit mobile version