जलीकट्टू खेळावर आणि नाताळ सणावर कोरोनाची पडली सावट…

देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना तामिळनाडू सरकारने बुधवारी जलीकट्टू खेळाच्या आयोजनाला परवानगी दिली आहे. जगभरामध्ये नवीन कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातवरण आहे. त्यामध्येचं जलीकट्टू खेळाच्या आयोजनाला परवानगी देणं हे महागात पडू शकते कारण देशभरात वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध लागू केले आहे.
जलीकट्टू या खेळात ३०० लोकांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्यपणे या खेळामध्ये दरवर्षी हजारो तरुण सहभागी होतात मात्र कोरोनाची सावट जलीकट्टू खेळावर पडली आहे. बैलावर नियंत्रण मिळवणारा हा खेळ पोंगल सणादरम्यान खेळण्यात येतो. या खेळाला दोन हजार वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे.
सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये जलीकट्टू आणि मंजुविरट्टू या दोन्ही खेळांमध्ये ३०० जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली असं म्हटलं आहे. तसेच इरुथुवरत्तू या खेळात दीडशे लोकांनाच सहभागी होता येणार आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर एक महिन्याने २०१७ साली ८ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान जलीकट्टूवर घातलेली बंदी उठवण्यासाठी मरीना सॅण्ड येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी नवी दिल्लीमध्ये जाऊन केंद्र सरकारकडून यासंदर्भात परवानगी घेतली होती. या आंदोलनामध्ये चेन्नईमधील काही ठिकाणी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी हवेत गोळीबारही करावा लागला.

या आंदोलनामध्ये एक दोन प्रसंगी हिंसाही घडली मात्र परवानगी मिळाल्यानंतर हे आंदोलन संपलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे आता नाताळ या सणावर विरजण पडले आहे. नातळ सण हा भारतात मोठ्या जलोष्यात साजरा करतात मात्र या वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक निर्बध लादली आहे.