Wed. Dec 8th, 2021

पुलवामामध्ये चकमकी सुरूच; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामातील अनंतनाग मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात भारतीय लष्करातील जवानांना यश आले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी शौकत अहमद धर यांच्यासह दोघे यामध्ये ठार झाले आहे. या चकमकी दरम्यान अनंतनागमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. 14 फेब्रुवारीला सीआरपीफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर काही दहशतवादी पुलवामा मध्ये लपून बसल्याची माहिती आहे. याची  शोधमोहीम सुरू असतामा या चकमकी होत आहे.

पुलवामामध्ये चकमकी सुरूच

पुलवामा मध्ये सीआरपीफ जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला झाला.

त्यानंतर पुलवामा मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात सतत चकमक होत आहे.

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामधील पंजगाम येथे पहाटेपासून चकमक सुरू आहे.

दहशतवाद्यांची 130 बटालियन सीआरपीएफ, 55 आरआर, एसओजी यांच्यात चकमक सुरू आहे.

या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

तसेच या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरूवारी देखील दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली.

यात सुरक्षा दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *