Fri. Dec 3rd, 2021

भारताने पाकिस्तानचं ‘एफ-16’ विमान पाडले

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानमध्ये घुसून जैशच्या तळांना उद्धवस्त केल्यामुळे बुधवारी पाकिस्तानचे तीन लढाऊ विमान भारताच्या हद्दीत घुसले.

काश्मीरच्या नौशेर सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी केली आहे. यावेळी पाकिस्तानी विमानं बॉम्ब टाकून पलायन करत असातानाच भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले.

नेमकं काय घडलं ?

सध्या भारत- पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्साठी भारतीय हवाई दलाने जैशच्या तळांना उद्धवस्त केले.

त्यामुळे बुधवारी पाकिस्ताने भारतात घुसखोरी केली.

आज सकाळी पाकिस्तानी जेट विमानांनी भारतीय हवाई हद्द पार केली.

भारतीय नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी विमानांनी ४ बॉम्ब फेकले असल्याची माहिती आहे.

नाडियान, लाम झांगर, केररी राजौरी भागात बॉम्ब टाकले असून यात एक नऊ वर्षाचा मुलगा देखील जखमी झाला आहे.

पाकिस्तानी विमान भारतीय हद्दीत बॉम्ब टाकून धूम ठोकत असताना भारताने पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं आहे.

काश्मीरमधील नौशेरा भागातील लाम खोऱ्यामध्ये भारताने पाकिस्तानचे विमान पाडलं.

पाकिस्तानचं एफ-16  विमान पाडत भारताने पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रतिउत्तर दिलं आहे.

भारताच्या प्रतिउत्तरानंतर पाकिस्तानची विमानं मागे फिरली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *