काश्मीरमध्ये पहाटे चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
पुलवामामध्ये बुधवारी पहाटे सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक…

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये बुधवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. ही चकमक पुलवामातील टिकेन भागात झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, “दोन अज्ञात दहशतवाद्यांचा पहाटे खात्मा करण्यात आला.
यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करून देखील अद्यापही दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम सुरुच आहे. शिवाय या भागात आणखी काही दहशतवादी लपले असेल काय? याचा शोध जम्मू-काश्मीर पोलीस आणि बीएसफचे जवान संयुक्तरित्या करत आहे.