Sun. Aug 18th, 2019

काश्मीरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

0Shares

पुलवामा हल्ल्यानंतर पाकीस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.पोलीसांनी या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा ही जप्त केला आहे. यामध्ये खात्मा झालेला दहशतवादी जैश- ए- मोहम्मद या संघटनेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू काश्मीर मध्ये सीमाभागामध्ये सतत दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमकी होत आहेत.

दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक

उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी सैन्यावर हल्ला करण्यात आला होता.

याचं चोख प्रत्युत्तर देण्यासाठी  सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली.

जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला येथील सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले.

दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

यामध्ये खात्मा झालेला दहशतवादी जैश- ए- मोहम्मद या संघटनेचा असल्याची शक्यता आहे.

या चकमकी दरम्यान पोलीसांनी या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा ही जप्त केला आहे.

चकमकीनंतर परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूचं आहेत.

जम्मू काश्मीर मध्ये सीमा भागामध्ये सतत दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमकी होत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *