Tue. Oct 26th, 2021

शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील केल्लर येथे पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये तकमक सुरू होती. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहिमेला सुरुवात केली आहे. सीआरपीएफचे जवान, लष्कर आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी केल्लरमध्ये हे संयुक्त ऑपरेशन केले.

नेमकं काय घडलं ?

जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील केल्लर येथे दशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू होती.

या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.

दशतवाद्यांकडूम मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

केल्लर येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना आणि जवानांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी पहाटेपासून गस्ती घालण्यास सुरुवात केली.

यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला.

सुरक्षा दलाने याचे प्रत्युत्तर देताना तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

तसेच या परिसरात आणखी दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जम्मु च्या हंदवाडा मध्ये देखील दहशतवदी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली.
दोन आतंकवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *