Fri. May 7th, 2021

काश्मीरमध्ये मसूद अझर आणि झाकीर मुसा यांच्या समर्थनार्थ घोषणा

पुलवामा हल्यानंतर जम्मु काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. जैश-ए-मोहब्बत या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याचा या हल्यात हात असल्याचं समोर आलं होत. यानंतर काश्मीरमध्ये तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. आज जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे जामा मशिदीजवळ दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी चकमकीत मारला गेलेला दहशतवादी झाकीर मुसा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.  यामुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.

नेमकं प्रकरण काय?

जम्मू काश्मीरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी केली जात आहे.

परंतु जामा मशिदीजवळ दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर आणि झाकीर मुसा यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.

या घोषणानंतर त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे.

‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’, ‘मुसा आर्मी’, ‘इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू- काश्मीर’,

अशा अशयाचे फलक देखील लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.

या ठिकाणी आता कडक पोलीस बंदोबंस्त तैणात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *