Tue. Jul 27th, 2021

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या  जन आशीर्वाद यात्रेचा जल्लोषात शुभारंभ

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या  जन आशीर्वाद यात्रेचा आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आलेला आहे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते यांनी आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केलंय.

सबंध महाराष्ट्रभर ही जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. यातून तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास आदित्य ठाकरे करणार आहेत. त्यामध्ये शेतकरी, व्यापारी, तरुण आणि सामान्य जनतेशी संवाद साधणार आहेत. या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात हे खानदेशापासून आणि विशेष करून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे जळगाव विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पाचोरा कडे प्रयाण केलं. दरम्यान इच्छापूर्ती गणेशाच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं

पाचोरा येथे देखील त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली होती. पाचोरा तालुका हा शिवसेनेचे वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात पासून उद्धव ठाकरे हे गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रचार सुरू करणार होते.

पाचोरा येथील संभाजी चौकातील कृष्णाजी नगर परिसरातील भव्य प्रांगणात ही सभा आयोजित करण्यात आली होती.

पाचोर्‍याचे शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील माजी मंत्री सुरेश जैन शिवसेनेचे नेते आणि सहकार मंत्री गुलाबराव पाटील आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यावेळी व्यासपीठावर होते.

‘ज्यांनी निवडून दिले, ज्यांनी आपल्याला मत दिले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी नाही दिली त्यांचे मन जिंकण्यासाठी आपण आलो आहोत’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे

तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री असतील!’

या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

त्यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आले तर आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असेल असं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

तेव्हापासून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनणार, अशी चर्चा आता सर्वत्र पाहायला मिळतेय.

जन आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यातून झालीय.

पाचोरा भडगाव कासोदा एरंडोल धरणगाव या ठिकाणी हे जन आशीर्वाद यात्रा पोहोचणार आहे. त्याचबरोबर मेळाव्यांचं देखील आयोजन करण्यात आलंय. संध्याकाळी चोपडा आणि सावखेडा त्याचबरोबर अमळनेर आणि पारोळा या ठिकाणीदेखील मेळावे आयोजित करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *