Mon. Aug 15th, 2022

Janata curfew : राज्यातील स्थिती जाणून घ्या एका क्लिकवर

देशासह राज्यात जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. एकूण 14 तासांचा हा जनता कर्फ्यु असणार आहे. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत हा जनता कर्फ्यु असणार आहे. जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यात या जनता कर्फ्युमुळे असलेली परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई

राजधानी मुंबई 24 तास सुरु असते. मात्र जनता कर्फ्युमुळे मुंबईत देखील कडकडीत बंद ठेवण्यात आलं. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये सर्वसामांन्याना अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच बेस्ट प्रशासनाने ही आपली सेवा 25% सुरू ठेवलेली आहे.

जनता कर्फ्युला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हे चित्र पहायला मिळते…वाहतूक कोंडी असणारा वेस्टर्न हायवेवर आज शुकशुकाट आणि पूर्ण रस्ता मोकळा दिसतोय.

मुंबईतील मासळी बाजारही पूर्णपणे बंद आहे. मुंबईत खास करून रविवारी मासळी बाजारात पाय ठेवायला ही जागा नसते, परंतु आज इथे पूर्ण पणे शुकशुकाट आहे. मच्छीमार लोकांनी उस्फूर्तपणे जनता कर्फ्यु ला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

ठाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला ठाणेकरांनी घरी थांबून प्रतिसाद दिला आहे. जनता कर्फ्युला ठाणेकरांचा 100% प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. नेहमी गजबजलेला असलेला स्टेशनं रोड परिसर पूर्णपणे निर्मनुष्य आहे.

#Janatacurfew : जनता कर्फ्युला सुरुवात, जनतेचा सकारात्मक प्रतिसाद

ठाण्यातील परिवहन सेवेच्या बसेस 40 टक्के रस्त्यावर धावत होत्या पण आता सेवा बंद करण्यात आली असुन ..ठाण्यातील वागळे आणि कळवा आगार येथून एकही गाडी पुढील आदेश येईपर्यंत रस्त्यावर धावणार नाहीये. म्हणजेच 100 टक्के बस सेवा बंद करण्यात आलीय..

नवी मुंबई

नवी मुंबईत जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील वाशी हे ठिकाण गजबजलेलं असतं. मात्र आज हा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य आहे.

शनिवारी कोकण विभागीय आयुक्तांमार्फत कोकण विभागातील सर्व 135 रेल्वे स्टेशनवर विशेष पथक नेमलंय. अत्यावश्यक आणि आरोग्य सेवेशी निगडित असणाऱ्या नागरिकांनाच लोकल रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेतील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय.

रायगड

कोरोनाच्या विरूध्द पुकारलेल्या जनता कर्फ्युला रायगडमध्ये चांगला प्रातिसाद मिळताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रायगडमध्ये नागरिक व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.

#JanataCurfew : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या – सफाई कामगार

ग्रामीण भागातील जीवनवाहीनी एसटी बससेवा शंभर टक्के बंद झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील वाहनांची ये-जा बंद राहीली.

पिंपरी

जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील जनतेने शनिवारीच भाजीपाला घेऊन ठेवला होता. पिंपंरीत देखील जनता कर्फ्युला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

महात्मा फुले भाजी मार्केट संघटनेने ही आज कडकडीत बंद पाळला.

अमरावती ग्रामीण

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी देशभर जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केलं होतं.

त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून अमरावतीच्या ग्रामीण भागात लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपले दुकान बंद केलं. या कृतीतून जनता कर्फ्यूला असलेला पाठिंबा दर्शवविल्याचे दिसून आलं.

यवतमाळ

विदर्भातील यवतमाळमध्ये देखील या जनता कर्फ्युला जनतेने योग्य प्रतिसाद दिलाय. यवतमाळमध्ये एसटी तसेच खासगी बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली

कल्याण डोंबिवलीत ही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. देशात जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आल्यानंतर ठाण्यातील डोंबिवली, कल्याण ,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर इथं ही कडकडीत बंद पाळला जात आहे.

रस्त्यावर पोलीस आणि महापालिका कर्मचारी फक्त दिसत आहे.

पंढरपुरात शुकशुकाट

नेहमी भाविकांनी आणि शहरातील नागरिकांनी गजबजलेल मंदिर परिसर आणि पंढरपूर शहर. आज सकाळी सहा वाजल्यापासून शांत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे.

विठ्ठल मंदिर परिसर आणि शहरातील सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद आहेत. एसटी, रेल्वे आणि खासगी वाहतूक बंद आहे. यामुळे सर्वत्र शुकशूकाट आहे.

नेहमी गर्दीने फुललेले रस्ते सकाळ पासून निर्मनुष्य झाले आहे आहेत. वाहनांची वर्दळ ही कमी आहे. ऐरवी गजबजलेल्या पंढरपूर शहरात निरव शांतता असल्याचे सकाळ पासून दिसून येत आहे.

#Corona : राज्यात कोरोनामुळे दुसरा मृत्यू, रुग्णांचा एकूण आकडा 74

दरम्यान राज्यात कोरोनामुळे आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना विषाणूमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. तर महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा हा ७४ वर जाऊन ठेपला आहे. अवघ्या एका दिवसात कोरोना रुग्णांच्या आकड्यात १०ने वाढ झाली आहे.

यामध्ये ६ मुंबईचे तर ४ पुण्याचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.