Janata curfew : जनता कर्फ्युला सुरुवात, जनतेचा सकारात्मक प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 ते रात्री 9 या एकूण 14 तासांचा हा जनता कर्फ्यु असणार आहे. या जनता कर्फ्युला सकारत्मक प्रतिसाद देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला जनता चांगला प्रतिसाद देत आहेत.









जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. या देशव्यापी अभियानाचं भाग बना, अशी विनंतीच पंतप्रधानांनी जनतेला केली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईला यशस्वी करा, असं व्हिडिओ पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे.
पंतप्रधानांसह अनेक बॉ़लीवूड अभिनेत्यांनिही जनतेला आवाहन केलं आहे. मराठमोठा अभिनेता रितेश देशमुखने एक ट्विट केलं आहे.
अभिनेता रितेश देखमुखने देशातील जनतेला कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. गुड मॉर्निंग इंडिया, घरात रहा, सुरक्षित रहा, असं आवाहन रितेश देशमुखने ट्विटद्वारे केलं आहे.
दरम्यान वारंवार आवाहन करुन देखील रेल्वे लोकलमधील गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे आज २२ मार्चपासून सर्वसामान्यांना रेल्वे लोकलमधून प्रवास करण्याची मुभा नसणार आहे. तसेच बेस्टची बससेवादेखील जनता कर्फ्युमुळे अंशत प्रभावित झाली आहे.