Fri. Jan 21st, 2022

पुराच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी साधेपणाने!

सांगली, कोल्हापूर आदी भागांना पुराचा फटका बसल्याने येथील जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. संकटात सापडलेल्या पूरग्रस्त लोकांना आधी मदत पोहचणं गरजेचं असल्याने बहुतांशी गोविंदा पथकांच्या मार्फतही सुरु आहे. तसेच दहीहंडी उत्सवातून जमा होणारी बक्षीसाची रक्कमही पुरग्रस्तांना देण्यासाठी या गोविंदा पथकांनी पुढकार घेतला आहे.

दुसरीकडे ठाण्यातील प्रमुख गोविंदा उत्सव आयोजकांनी या पुरस्थितीचे भान ठेवून यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचं निश्चित केलं आहे. काही आयोजकांनी बक्षीसाची रक्कम कमी केली आहे, काहींनी गाव दत्तक घेण्याचे निश्चित केले आहे. तर काही मंडळींना या उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम पूरग्रस्त भागांना देण्याचे निश्चित केले आहे. तर काही मंडळींनी पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याचा निर्धार केला आहे.

प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही प्रो गोविदांचे आयोजन करण्यात आले आहे.

परंतु यंदा त्याचे आयोजन साधेपणाने असणार असून एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दहीहांडी उत्सवाच्या ठिकाणी यासाठी अन्य कोणाला आणखी मदत करायची असेल तर त्यासाठी स्टॉल उभारण्यात येणार आहे.

शिवाय या उत्सवाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही पूरग्रस्त भागासाठी दिली जाणार आहे.

जांभळीनाक्यावर आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित हदीहांडी कॅन्सरग्रस्त मुलांकडून सकाळीच काही थर लावून फोडली जाणार आहे.

तर दुसरीकडे टेंभीनाक्यावरील हंडीचा सण हा पारंपारीक पद्धतीने साजरा केला जाणार असून त्यातून जमा होणारी रक्कम ही पुरग्रस्तांसाठी दिली जाणार आहे.

रघुनाथ नगर भागातील संकल्पच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या हंडीं सुध्दा बक्षीसांची रक्कम कमी करण्यात आली असून थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना बक्षीसं असणार नाहीत. शिवाय यातून जमा होणारी रक्कम पुरग्रस्थांना दिली जाणार आहे.

हिरानंदानी मेडोज येथे साजरी होणारी दहीहांडीही पुरग्रस्तांसाठी आयोजित करण्यात येणार असून यंदा बक्षीसाची 5 लाख 55 हजारांची रक्कम ही पुरग्रस्तांसाठी दिली जाणार आहे. कोणतेही कलाकार अथवा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जाणार आहे. तसंच या उत्सवाच्या माध्यमातून जी रक्कम गोळा होईल ती पुरग्रस्त भागांसाठी दिली जाणार आहे.

याशिवाय चंदगड तालुक्यातील 25 पुरग्रस्तांना घरे नव्याने बांधून देण्याचा मानस स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने सोडण्यात आला आहे.

मात्र ठाण्यातील आयोजकांनी दहीकाला उत्सवाचं आयोजन करावं, कारण गेल्या दोन महिन्यांपासून मंडळं सराव करत आहेत. खेळ टिकवण्यासाठी तरी आयोजन करावं असं ठाण्यातील गोविंदा समन्वयकानी सांगितलं आहे.

या दहीहंडी सुरक्षेसाठी QRT टीम, SRPF टीम, CNL ऑफिसर तर रिझर्व्ह फोर्स असणार आहेत, तर सर्वच पोलीस अधिकारी ड्युटीवर असणार आहेत. त्याचबरोबर बिट मार्शल आणि गस्त घालणारे पोलीस असणार आहेत. महिला छेडछडिसारखे प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये काही विशेष महिला पोलीस टीम असणार आहेत. तयार मंडळांना त्यांचे स्वयंसेवक तैनात करण्यास सांगितलंय. तसंच CCTV ची नजरही असणार आहे. जवळपास चार हजार पोलीस कर्मचाऱ्यांना दहीहंडी उत्सवासाठी तैनात करण्यात आलं असून, वेळ पडली तर ड्रोनचाही वापर करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *