गोपाळकाला स्पेशल रेसिपी : माव्याचे लाडू
सण म्हटले की गोड पदार्थ हे घरी हमखास बनवले जातात. त्यातून गोकुळाष्टमीचा उत्सव असेल, तर दुधाचे पदार्थ, मिठाई यांची रेलचेल असते. या गोकुळाष्टमीला बनवा असाच एक दुधाचा गोड पदार्थ… माव्याचे लाडू…
साहित्य:-
पनीर – 100 ग्रॅमp
खवा – 100 ग्रॅम
पिठी साखर – 50 ग्रॅम
वेलची पावडर ¼ चमचा
बारीक केलेले ड्रायफ्रुट्स – 2 मोठे चमचे (काजू,बदाम,पिस्ता)
कृती:-
- प्रथम पनीर किसून घ्या.
- हे किसलेलं पनीर आणि खवा एकत्र मळून घ्या.
- त्यानंतर पिठी साखर घाला.
- मावा घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्या.
- मग त्याचे छोटे-छोटे लाडू बनवा.
- नंतर ते स्वीट्स फ्रिजमध्ये ठेवा.
- थंड झाल्यानंतर ते सर्व्ह करा.
गोकुळाष्टमीला या लाडूंचा नैवेदय कृष्णाला अर्पण करा आणि कुटुंबासोबत आवडीने खा.