Sat. Jun 12th, 2021

जपानमध्ये तब्बल 10 वर्षे एका महिलेचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

जपानमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीने तब्बल दहा वर्षे आपल्या आईचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आईच्या संपत्तीवर मालकी हक्क मिळावा म्हणून या महिलेने हे विकृत कृत केल्याचं खळबळ उडली आहे. आईच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये आपल्याला आरामात राहता यावे, म्हणून मृत आईचे शव मुलीने फ्रिजमध्ये लपवला होता. शनिवारी जपानी माध्यमांनी याबाबत बातमी दिली की, या महिलेने तब्बल एका दशकासाठी आपल्या अपार्टमेंटमधील फ्रिजमध्ये आईचा मृतदेह लपवला होता. योशिनो असे या महिलेचे नाव आहे. योशिनो हिने गेल्या 10 वर्षांपूर्वी हा मृतदेह घरातील फ्रीजमध्ये ठेवला होता. कारण तिला आईचे घर कधी सोडायचे नव्हते. सदर घटना 10 वर्षांनी लोकांसमोर येताच या महिलेने यामागचे कारण सर्वाना सांगितले. आपल्या आईच्या घरातून कोणाही आपल्याला बाहेर घालवून देऊ नये आणि आपल्याला आईसोबत राहता यावे म्हणून तिने असे कृत्य केले असं सांगितले.

क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कामानिमित्ताने स्थानिक पालिकेची टीम हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील फ्लॅट रिकामी करण्यासाठी त्या घरात पोहोचली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अहवालात असं म्हटले आहे की, योशिनोचा भाडे करार पूर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्यात ही अपार्टमेंट सोडण्यास भाग पाडले गेले होते आणि तेव्हाच या फ्रीजमध्ये लपवलेल्या मृतदेहाची घटना समोर आली.आईच्या मृत्यूच्या वेळी ही मुलगी सुमारे 60 वर्षांची होती. आता काही क्लीनरच्या मदतीने हा मृतदेह आता बाहेर काढण्यात आला आहे. अहवालानुसार या महिलेच्या मृत्यूची वेळ आणि कारणे अध्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *