Wed. Jun 23rd, 2021

जस्प्रीत बुमराहला बहुमान, बीसीसीआयकडून मिळणार ‘हा’ पुरस्कार

बीसीसीआयने 2018-19 सालच्या पुरस्करांसाठी खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या जस्प्रीत बुमराहला पुरस्कार मिळणार आहे.

बुमराहला या सीझनमधील बेस्ट इंटरनॅशनल मेन्स क्रिकेटर पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

बुमराहला पहिल्यांदाच बेस्ट इंटरनॅशनल मेन्स क्रिकेटर पॉली उम्रीगर या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

याआधी सलग 2 वर्ष विराट कोहलीला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

तर सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर हा पुरस्कार टीम इंडियाच्या पूनम यादवला मिळाला आहे.

जस्प्रीत बुमराह आणि पूनम यादव या दोघांना पुरस्कार आणि प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षिसाच्या स्वरुपात दिले जाणार आहेत.

बुमराहने 12 टेस्टमध्ये 62 विकेट घेतले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजमध्ये बुमराची उत्तम कामगिरी केली आहे.

महिला क्रिकेटपटू पूनम यादवने देखील चांगली कामगिरी केली आहे. पूनम यादवने 2018 पासून 23 वनडेमध्ये 39 विकेट घेतले आहेत.

तर टी-20 मध्ये 39 मॅचमध्ये 51 खेळाडूंना माघारी पाठवलं आहे. तिच्या या कामगिरीसाठी पूनमला पुरस्कार देण्यात येणार आहे. याआधी पूनम यादवला अर्जून पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

तर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

तसेच अंजूम चोप्रा यांना (महिला) बीसीसीआयचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.

बीसीसीआयच्या 2018-19 या वर्षासाठी पुरस्काराचे मानकरी

के श्रीकांत – कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार

अंजूम चोप्रा – बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार (महिला)

जसप्रीत बुमराह – पॉली उम्रीगर पुरस्कार

पूनम यादव – सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *