Sun. Aug 25th, 2019

अखेर “ती” आलीच…

0Shares

तुषार शेटे, न्यूज एडिटर, जय महाराष्ट्र न्यूज
तुम्हाला एखादी मुलगी आवडत असेल आणि तिला इंप्रेस कसं करायचं यासाठी एखादी भन्नाट आयडीया तुम्ही शोधत असाल किंवा , तुमच्या होणा-या प्रियकराला किंवा नव-याला एखादं हटके सरप्राईज तुम्हाला द्यायचं असेल तर “जावा” तुमची वाट पहातंय. 70 च्या दशकात आपली वेगळी ओळख जपणारी “जावा” आता नव्या तंत्रज्ञानासह मात्र त्याच रुपात पुन्हा एकदा भारतात धावण्यासाठी सज्ज झालीये.
मोटरसायकल ब्रँड पुन्हा एकदा भारतीय बाजारात उतरण्यासाठी सज्ज झालंय. “जावा” कंपनीने नुकतेच 3 मॉडेल लाँच केले असुन यात 293 आणि 334 सीसी इंजिनाचा समावेश आहे. सध्या सर्व कार्स आणि बाईकसाठी BS4 अनिवार्य केलेलं असलं तरीही “जावा”BS6 मानक पूर्ण करणारी आहे.
सत्तरीच्या दशकात “जावा” कंपनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र काही कारणांमुळे 1996 मध्ये कंपनीने भारतातुन काढता पाय घ्यावा लागला होता. मात्र महिंद्रा अॅण्ड महिंद्रासोबत “जावा” पुन्हा एकदा भारतात येण्साठी सज्ज झालीये. “जावा”ने गुरुवारी 3 मॉडेल्स लाँच केली आहेत यात “जावा”स्टँडर्ड, “जावा 42 आणि “जावा”पर्क यांचा समावेश आहे. “ जावा ” सँडर्ड आणि “ जावा 42 मध्ये 293 CCचं लिक्वीड कुल, सिंगल सिलेंडर DOHC इंजिन असून यांची दिल्लीतली एक्स शोरुम किंमत अनुक्रमे 1,64,000 1,55,000 रुपये आहे तर Jawa Perak मध्ये 334 CC इंजिन असून पर्कची दिल्लीतली एक्स शो रुम किंमत 1.89 लाख असणार आहे. रंगाच्या बाबतीत “जावा” ब्लॅक, मरून आणि ग्रे कलर या 3 रंगात उपलब्ध असणार आहे तर “जावा 42” ही चक्क नेब्युला ब्लू, कॉमेट रेड, स्टारलाईट ब्लू, ल्युमोस लाईम, हॅलीज टील आणि गलॅक्टीक ग्रीन या 6 रंगात उपलब्ध असणार आहे.
“जावा” ने या मोटारसायकलला अशा पद्धतीने डिझाइन केलं आहे की, या बाईकला बघताच तुम्हाला 80 ते 90 दशकाची आठवण येईल. विटेंज लूक्ससोबत कंपनीने टेक्निकल या गाडीला अधिक अॅडव्हान्स आणि दमदार बनवलंय. त्यामुळे 60 च्या दशकातली “ जावा ” पुन्हा एकदा 21वं शतक गाजवायला आणि तरुणाईच्या मनावर अधिराज्य करायला तयार झालीये.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *