बंदोबस्ताचा ताणामुळे जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

पोलिसांना तसेच जवानांना कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडावे लागते. हे कर्तव्य पार पाडताना पोलिसांना अथवा जवानांना वेळेचं बंधन नसतं. यामुळे जवानांवर अतिरिक्त ताण येतो.

या बंदोबस्ताच्या ताणामुळेच एका जवानाचा राजधानी दिल्लीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मृत्यू झालेला जवानाचं मुकेश कदम असं नाव आहे. मुकेश कदम हे मुळचे कोकणातील मंडणगड तालुक्यातील लाटवणचे सुपुत्र आहेत.

सीएएवरुन देशाच्या राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळलेला.

या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या बंदोबस्तात भारतीय जवानांनाही तैनात करण्यात आलं

मुकेश कदम हे दिल्लीमधील दंगलग्रस्त भागात तैनात होते. दंगलीच्या बंदोबस्ताचा अतिरिक्त त्रास त्यांना असह्य झाला. परिणामी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

मुकेश कदम यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.

तसेच मुकेश कदम यांचं पार्थिव शरीर मंगळवारी मूळ गावी आण्ण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Exit mobile version