Wed. Dec 1st, 2021

‘डरपोक भारतास एक संधी मिळताच साफ करून टाकू’, जावेद मियाँदादची मुक्ताफळं

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर त्याचे पाकिस्तानात पडसाद अजूनही उमटत आहेत. पाकिस्तान हरतऱ्हेने भारताविरोधात प्रयत्न करूनही अद्याप यशस्वी झालेलं नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान म्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मागूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पाकिस्तानी कलाकार तसंच खेळाडूही आता भारताविरुद्ध गरळ ओकण्याचं काम करत आहेत. त्यातच आणखी एका खेळाडूची भर पडली आहे… हा खेळाडू म्हणजे क्रिकेटर जावेद मियाँदाद.

आत्तापर्यंत शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, सरफराज अहमद यांसारख्या क्रिकेटपटूंनी काश्मीरला भारतापासून विलग करण्यासंदर्भात Tweets केली होती. आता जावेद मियाँदादने तर प्रतिक्रिया देताना भारत डरपोक राष्ट्र आहे, त्याला घाबरायची गरज नाही असं वक्तव्य केलंय. आपण भारताच्या सर्व बॉर्डर्स ओलांडून हल्ला करू अशी मुक्ताफळंही उधळली आहेत.

प्रत्येकवेळी कायदेकानून तुमच्या मदतीला येत नाहीत.

तुमच्याकडे हत्यारं असतील, तर तुम्ही हल्ला करायला हवा.

जेव्हा त्यांचे मृतदेह घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल, अशी धमकीवजा बडबड मियाँदादने केलीय.

तसंच मोदींनी काय सल्ला देशील, असं पाकिस्तानी चॅनलवर त्याला विचारलं असता भारत डरपोक राष्ट्र आहे आणि एक संधी मिळाली तर सगळा भारत आम्ही अण्वस्त्रांनी साफ करून टाकू असं उत्तर त्याने दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *