Fri. Sep 30th, 2022

जय वाघ गेला तरी कुठे ?

 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

वाघांमुळे कोट्यवधींची कमाई करणाऱ्या वनखात्याला वाघांशी काहीच देणंघेणं नाही का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

कारण उमरेड-कऱ्हाड अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाचा वर्षभरानंतरही थांगपत्ता लागलेला नाही. वर्ष उलटूनही जय वाघ अद्याप सापडलेला नाहीये…जागतिक व्याघ्रदिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी जय 100 टक्के सापडेल आणि वनखात्याचा जय होईल, असं आश्वासित केले.

 

तर, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही जयचा इतिहास त्याच्या भटकंतीची साक्ष देतो. त्यामुळे आज ना उद्या तो सापडेल असा विश्वास व्यक्त केला होता.

 

वन्यजीवप्रेमींनी पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण अशा देशपातळीवरील तब्बल 12 यंत्रणांना ई-मेल पाठवले तसंच त्याच्या शोधासाठी 50 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होते.

 

संसदेतही हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर विशेष तपास पथक स्थापन झाले. तर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची समितीही 20 जानेवारी 2017ला नागपुरात आली.

 

मात्र, या दोन्ही समितीच्या पुढील हालचाली मात्र कळल्याच नाहीत. त्यामुळे वनखात्याचा बेफिकीरपणा यातून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.