Sat. Jun 19th, 2021

जायकवाडीत 88 टक्के पाणीसाठा, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना दिलासा

नाशिक अहमदनगरवरून सोडलेल्या पाण्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ असून जायकवाडी पाणी पातळी 88 टक्क्यांवर पोहचली आहे. जायकवाडीमध्ये सध्या 54 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे.

नाशिक अहमदनगरवरून सोडलेल्या पाण्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ असून जायकवाडी पाणी पातळी 88 टक्क्यांवर पोहचली आहे. जायकवाडीमध्ये सध्या 54 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडीच्या उजव्या कालव्यतुन 800 क्युसेक्सने तर डाव्या कालव्यातून 400 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं आहे. अपेगाव हिरडपुरीसाठी पैठण जलविद्युतमधून 1589 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड, परभणी या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. धरणाची टक्केवारी 35 च्यावर गेल्याने शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  जायकवाडीच्या उजव्या कालव्यतून माजलगाव धरणासाठी 800 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं आहे. अपेगाव हिरडपुरीसाठी 1589 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे.

जायकवाडीचे धरणात पाणी सोडले…

यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड, परभणी या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. येथील धरणांमध्ये पाणी सोडण्यात आलं आहे. धरणाची टक्केवारी 35 च्यावर गेल्याने शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जायकवाडीचे एकूण क्षमता 102 टीएमसी असून जायकवाडीत 88 टक्के पाणीसाठा आहे. तर 65 टीएमसी जिवंत पाणीसाठा झाला आहे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना जायकवाडीचा फायदा होतो. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना फायदा होतो.

जायकवाडीच्या खालील एकूण नऊ बंधारे आहेत. आपेगाव, हिरडपुरी, लोणी सांगवी, राजाटाकळी, मंगरूळ, डिग्रज, पाथरवाला, मुग्दल, मुळी हे बंधारे जायकवाडीतुन पाणी सोडले जाते. उजव्या कालव्यातून 800 क्‍युसेकने माजलगाव धरणासाठी विसर्ग सुरु झाला आहे. डाव्या कालव्यातून परळी थर्मलसाठी 400 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. पहिल्या टप्प्यात हिरडपुरी व आपेगावसाठी पाणी सोडण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *