Sun. Sep 19th, 2021

एक्झिट पोलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी घाबरू नये – जयंत पाटील

लोकसभा निवडणुकांचा शेवटचा  टप्पा  म्हणजेच सातवा टप्प्यासाठी  नुकतंच मतदान पार पडलं. यानंतर सर्वच न्यूज चॅनेल्सने आपला एक्झिट पोल दाखवला. यामध्ये पुन्हा मोदींचीच सत्ता येईल. अशा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलवर प्रत्येक राजकिय नेते यावर आपलं मत व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर आपली भूमिका मांडली आहे. एक्झिट पोलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

एक्झिट पोलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी घाबरून जाऊ नये.
लाट निर्माण करून 300 जागा विजयी होतील अशी काही मोदींची लाट दिसून येत नाही
महाराष्ट्रात आघाडीला 18 ते 22 च्या दरम्यान जागा मिळतील.
एक्झिट पोलमध्ये विरोधक हारलेत या भ्रमात देशाची जनता कधीच राहणार नाही.
 मागील अनुभव पाहता एक्झिट पोल आणि लागलेला निकाल यामध्ये फरक असून प्रत्यक्षात मात्र तसा रिझल्ट लागलेला नाही.
याचबरोबर मतमोजणी केंद्रात विरोधी पक्षाचे प्रतिनिधी नक्कीच व्हीव्हीपॅट मधील मते मोजण्याबाबत आग्रह करतील असेही ते म्हणाले.
याचबरोबर एक्झिट पोल नंतर भाजपाकडून विजयाचा आनंद व्यक्त केला जात आहे.
त्यांनी सांगलीमध्ये याविषयी आपली भूमिका व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *