Fri. Sep 30th, 2022

‘फडणवीसांच्या सोबतीशिवाय शिंदेंचं दिल्लीत कोण ऐकणार?’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तारही जाणार आहेत.राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची देखील भेट घेणार आहेत. वेदांता-फॉक्सकॉन हा हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की,”देवेंद्र फडवणीस हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत नसतील तर एखाद्या वेळी दिल्ली हायकमांडची भेटही मिळणार नाही.” उपमुख्यमंत्री गेल्याशिवाय सीएमचं तिथे कोण ऐकणार? मुख्यमंत्री एकटे दिल्लीला जाऊन काय उपयोग असा सवाल विचारत मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांनीही सुद्धा जायला हवं, असं जयंत पाटील म्हणाले. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जेवढं दिल्ली ऐकते तेवढं एकनाथ शिंदे यांचं ऐकेल का, असाही प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर मी समजू शकतो की महाराष्ट्र सरकार गंभीर आहे, असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्याच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली.

4 thoughts on “‘फडणवीसांच्या सोबतीशिवाय शिंदेंचं दिल्लीत कोण ऐकणार?’

  1. I know this if off topic but I’m looking into starting my own blog and was wondering what all is needed to get setup? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very web smart so I’m not 100 positive. Any suggestions or advice would be greatly appreciated. Thanks

  2. ทางเราจำหน่าย kardinal stick
    , ks quik , ks kurve ต้องขอบอกได้เลยว่า kardinalstealththailand.com เป็นตัวแทนหลักอย่างเป็นทางการในไทย ที่ใหญ่ที่สุด และเป็นเจ้าเดียวกับ RELX
    THAILAND สินค้าทุกแบรนด์ ทุกรุ่นเราได้ทำการคัดสรร บุหรี่ไฟฟ้า ที่เป็นหนึ่งในนวัตกรรม ช่วยเลิกบุหรี่ ที่มีประสิทธิดีเยี่ยม และช่วยได้จริงมาให้ลูกค้าได้เลือกใช้ โดยสินค้าทุกชิ้นของเรา
    สั่งตรงจากโรงงาน

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.