Mon. Dec 6th, 2021

जयंत पाटलांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ

सोलापुर : सोलापुरात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्याच्या आदेशाला हरताळ फासण्यात आली. पक्षप्रवेशासाठी आयोजित कार्यक्रमासाठी जयंत पाटील हजर होते. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमात आंतरभानाचा पुरता फज्जा उडवला गेला. दुसरीकडे, औरंगाबादमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडूनही आंदोलनादरम्यान आंतरभानाचा पुरता फज्जा उडवला गेला. औरंगाबाद इथे केंद्र सरकारच्या इंधन दरधोरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व अमित देशमुख यांनी केले. त्यावेळी नियम मोडल्या प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, मंत्र्यांवर कसलीही कारवाई झाली नाही. यामुळे, सामान्यांना वेगळे नियम आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *