Wed. Jul 28th, 2021

‘यासाठी’ जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून केला शिवसेनेत प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. शिवसेना-भाजपच्या व्यासपीठावरही त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काय म्हणाले क्षीरसागर?

जिल्ह्याच्या विकासासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे.

मी शरद पवार यांच्या कानावर माझी नाराजी घातली होती पण त्यांनी पाहतो असं सांगून कोणतीही कारवाई केली नाही.

आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या कडे सोपावला यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर आणि शिवसेना नेते सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *