Wed. Apr 14th, 2021

यंदा सोमवती अमावस्येला जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन नाही

jejuri temple closed for devotees

जय महाराष्ट्र न्यूज, पुरंदर: येत्या सोमवारी सोमवती अमावास्या आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी गडावर दरवर्षी होणारा यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी 12 डिसेंबर ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.


चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रूढी, परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *