Sun. Aug 1st, 2021

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर पसरली निळाई

 

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

शेतकऱ्यांसाठी यंदा मान्सून समाधानकारक आहे. हा मान्सून लवकरच येणार आहे. हे भविष्य आम्ही नाही तर समुद्रातल्या जेली फिशच सांगत आहेत.

 

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या निळाई पसरली.  लाखोंच्या संख्येनं ब्ल्यू बटण जेलीफीश रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर पसरल्या आहेत.

 

बटणाऱ्या आकाराएवढ्या लहान आणि निळ्या रंगाच्या या जेली फिशनी समुद्रकिनारा व्यापून टाकला आहे.

 

पाच वर्षांनी रत्नागिरीकरांना या ब्ल्यू बटण जेलीफिशचं दर्शन झाले. समुद्रातल्या अंतर्गत प्रवाहामुळे किनाऱ्याजवळच्या मातीत रुतून लाखो जेलीफिश मृतही पावल्या आहेत. पर्यटकांनी मात्र या जेलीफिशना हात लावणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *