Tue. Aug 20th, 2019

Jet airways च्या 500 कर्मचाऱ्यांचा Spicejet मधून पुन्हा take off!

0Shares

जेट एअरवेज कंपनी बंद पडण्यामुळे या कंपनीच्या जवळपास 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिलंय. Jet airways कंपनी बंद करण्यात आल्यामुळे सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर पडत आहेत. इथे काम करणाऱ्या पायलट्स, एअरहोस्टेसेस, कर्मचारी यांच्या भवितव्यावर भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. मात्र सध्या त्यांच्यापुढे असणाऱ्या अंधारात प्रकाशाचा एक बारीकसा किरण डोकावलाय. हा किरण म्हणजे spicejet. जेट एअरवेजपेक्षा फारच लहान आणि स्वस्तातली एअरलाइन्स म्हणून ओळख असणाऱ्या स्पाइसजेटने जेट एअरवेजच्या 500 कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत रूजू करण्याची तयारी दाखवली आहे.

Jet Airways मधून लँडिंग, Spicejet मधून पुन्हा take off!

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना Spicejet यथाशक्ती हात देत आहे.

Jet airways चे  100 वैमानिक, 200 तांत्रिक कर्मचारी आणि 200 केबिन क्रू कर्मचारी यांना Spicejet ने आपल्याकडे कामावर घेतलंय.

यामुळे  जेट एअरवेजच्या काही कर्मचाऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे.

आणखीही काही कर्मचाऱ्यांना घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याचसोबत स्पाइस जेट त्यांच्या 24 नव्या उड्डाणांची त्यांनी घोषणा केली आहे.

बुडत्याला काडीचा आधार

काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज कंपनी बंद पडली होती.

यामध्ये सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली होती.

पण आता स्पाइस जेट यांनी जेट ऐअरवेजला मदतीचा हात दिला आहे.

जेट च्या जवळपास 500 कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावर घेतले आहे.

यामध्ये जेटचे 100 वैमानिक, 200 तांत्रिक कर्मचारी आणि 200 केबिन क्रू कर्मचारी आहेत.

त्यानंतर आणखी काही कर्मचाऱ्यांना घेण्याची तयारी दाखवली आहे. स्पाईसजेटने 24 नव्या उड्डाणांची घोषणा केली आहे. या उड्डाणांची सेवा 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सुरु होईल.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *