Mon. Sep 20th, 2021

जेट एअरवेज जमिनीवर, कर्मचारी बेरोजगार

जेट एअरवेजने वर्षभरापूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली होती. मात्र जेट एअरवेजने ही विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून जेट एअरवेजच्या वैमानिकांना वेतन मिळाले नसल्यामुळे 1 एप्रिलपासून काम थांबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. वैमानिकांनी हा संप 15  एप्रिलपर्यंत पुढे ढकललला.गेल्या अनेक महिन्यांपासून जेट एअरवेज कंपनी आर्थिक संकटात आहे. यामुळे जेटचे भवितव्य काय असणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.या कंपनीतील लाखो कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात जेटएअरवेज एम्प्लॉय युनियन आणि कंपनीचे अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली आहे.

नेमकं प्रकरणं काय?

गेल्या अनेक महिन्यांपासून जेट एअरवेज कंपनी आर्थिक संकटात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून जेट एअरवेजच्या वैमानिकांना वेतन मिळालेले नाही.

1 एप्रिलपासून काम थांबवण्यात येणार असल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केली होती.

यासंदर्भात जेटएअरवेज एम्प्लॉय युनियन आणि कंपनीचे अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली आहे.

एम्प्लॉय युनियन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक

एम्प्लॉय युनियनचे नेते किरण पावसकर आणि कंपनीचे CEO दुबे तसेच अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.

25 वर्षांपोसून जेट एअरवेज कंपनी सुरू असून जग भरात कंपनीचे नाव आहे.

कंपनीची अशी परिस्थिती का झाली याची CBI चौकशी करण्याची किरण पावसकर यांनी केली.

केंद्र सरकार आणि सिव्हिल एवियेशन फक्त घोषणा करण्यासाठी आहे का? असा सवालही करण्यात आला आहे.

फायनान्स मिळालं तर कंपनी चालेल असं मत CEO दुबे यांनी व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकारने जेटएअरवेजला मदत करावी जेणे करून ही कंपनी पुन्हा व्यवस्थित सुरू होईल.

इंधन विकत घ्यायला देखील पैस नाहीत अशी स्थिती जेट एअरवेजची झाली आहे.असं ही CEO यांनी सांगीतलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून मदत मागण्यात आली असल्याचं पावसकर यांनी सांगीतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *