Mon. Sep 20th, 2021

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरी ईडीचे छापे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरात आणि कार्यालयात ईडीने छापे टाकले आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये 12 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एतिहाद एअरवेज कंपनीने जेट एअरवेजमध्ये केलेल्या गुंतवणुकीची चौकशीसाठी छापे टाकले असल्याचे समजते आहे.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरात ईडीचे छापे –

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने छापे मारले असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई आणइ दिल्लीमध्ये 12हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

तसेच एतिहाद एअरवेज कंपनीने जेट एअरवेजमध्ये केलेल्या गुंतवणुकीची चौकशीसाठी छापे टाकले आहेत.

एतिहाद एअरवेजने 2014 साली गुंतवणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याचे म्हटलं जात आहे.

जेट एअरवेजवर 8500हून अधिक कर्ज असून कर्मचाऱ्यांचा पगाराचा आकडा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

नरेश गोयलसह त्यांच्या पत्नीने मार्च महिन्यात राजीनामा दिला होता.

तसेच कॉर्परेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवलात गैरव्यवहार झाला असल्याचे आढळले.

त्यानंतर काही दिवसातच जेट एअरवेजची सेवा बंद करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *