Mon. Sep 20th, 2021

जेट एअरवेजच्या वैमानिकांनी संप १५ दिवसांनी पुढे ढकलला

गेल्या अनेक महिन्यांपासून जेट एअरवेजच्या वैमानिकांना वेतन मिळाले नसल्यामुळे १ एप्रिलपासून काम थांबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र हा संप सध्या काही दिवसांकरीता पुढे ढकलण्यात आले असल्याचे समजते आहे. त्यामुळे वैमानिकांनी हा संप १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले आहे. वेतन मिळण्यासाठी जेटच्या वैमानिकांनी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती.

नेमकं प्रकरण काय ?

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे वेतन झाले नसल्यामुळे वैमानिकांनी संप करण्याचा निर्णय घेतला.

१ एप्रिलपासून काम थांबवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

रविवारी मुंबई आणि दिल्लीत झालेल्या एनएजी सदस्यांच्या खुल्या बैठकीत संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे समजते आहे.

वैमानिकांनी हे संप १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच जेटच्या वैमानिक, अभियंते आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून अनियमित आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *