Jaimaharashtra news

भरदिवसा गोळीबार करून ज्वेलर्सच्या दुकानात लूट

पुणे : कोथरुडमधील आनंदनगर येथे भरदिवसा हवेत गोळीबार करत ज्वेलर्सच्या दुकानात लुटीची घटना घडली आहे. ही घटना रविवारी 24 नोव्हेंबरला संध्याकाळी घडली. कोथरुडमधील आनंद नगर चौकातील पेठे ज्वेलर्समध्ये ही घटना घडली.

रविवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास दोघांनी ग्राहक म्हणून दुकानात प्रवेश घेतला. यावेळेस या दोघांनी मालकासह कामगारांना बंदुकीची भिती दाखवत दागिने लुटायला सुरुवात केली. यासर्व विरोधात कामगारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

परंतु चोरट्यांनी हवेत बंदुकीचे दोन राऊंड फायर केले. या चोरट्यांनी लाखोंचा दागिने घेऊन पळ काढला. दैव बळवत्तर म्हणून या सर्व घटनेदरम्यान कोणीही जखमी झाला नाही.

या सर्व घटनेचा प्रकार ज्वेलर्समधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांनी दागिने घेऊन चांदणी चौकाच्या दिशेने गेल्याची माहिती तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली.

दरम्यान या सर्व घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. ज्वेलर्समधून नक्की किती मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला याची माहिती पोलिस घेत आहेत.

Exit mobile version