Sun. May 16th, 2021

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात

महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये विधानसभा निवणडूक पार पडली होती. या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. हि निवडणूक 81 जागांकरीता घेण्यात आली होती. दरम्यान आज सकाळी 8 वाजल्यापासून याची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

यासाठी झारखंडमधील सर्वच केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदान प्रक्रिया एकूण 5 टप्प्यात घेण्यात आली होती.

झारखंड राज्यातही भाजपाची सत्ता आहे. तर ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन हा विरोधी पक्ष म्हणून आहे. झारखंडचे रघुबर दास हे मुख्यमंत्री आहेत. तर विरोधी पक्षनेतेपदी हेमंत सोरेन हे आहेत.

बहुमतासाठी सत्ताधारी पक्षाला 41 जागांची आवश्यकता आहे. आता या सत्ताधारी पक्ष या जागा मिळवू शकतो का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तसेच महाराष्ट्रप्रमाणेच भाजपाची सत्ता झारखंडमधूनही जाते का पुन्हा भाजपच सत्तेत येणार की काँग्रेस सत्ता हस्तगत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

दरम्यान एक्झिट पोलच्या अहवालानुसार झारखंडमध्ये भाजप सत्ता कायम राखण्यात अपयशी ठरणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *