Sun. May 16th, 2021

झारखंडमध्ये भाजपला धक्का

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळी 8 पासून सुरुवात झाली.

काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीने 41 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 30 जागेवर आघाडी घेतली आहे. झारखंड विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 41 हा मॅजिक फिगर आहे.

पक्षनिहाय मिळालेल्या जागा

काँग्रेस आघाडी : 41

भाजप : 30

जेव्हीएम : 3

आजसू : 3

इतर : 4

त्यामुळे आता भाजपला महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडपाठोपाठ सत्ता गमावायला लागणार आहे. भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

झारखंडमध्ये एकूण 81 जागांसाठी एकूण 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली.

भाजपने 2014 च्या निवडणुकीत 37 जागा जिंकल्या होत्या. भाजपने तेव्हा आजसूसोबत सरकार स्थापन केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *