Sat. Oct 1st, 2022

झुलन गोस्वामीचा आणखी एक व्रिकम

आयसीसी महिला विश्वचषकात झुलन गोस्वामीनं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० बळी घेणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आतापर्यंत २०० विकेट्स टप्पाही गाठता आलेला नाही. झुलन गोस्वामी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळणार आहे.एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीत भारताची कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. तिने आतापर्यंत २२९ एकदिवसीयआंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.