Sun. Feb 28th, 2021

सरकार ‘तबलिगी मरकज’वर खापर फोडतंय, जिग्नेश मेवाणीचा सरकारवर आरोप

कोरोना संकटाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र आता दिल्लीच्या निजामुद्दिन येथे झालेल्या तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रम त्याच्या काही दिवस आधी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कोरोना बाधित काही लोक उपस्थित असल्याने कोरोनाची लागण पसरण्याची भीती वाढली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ३० जणांना कोरोनाची लागण असल्याचं चाचण्यांत स्पष्ट झालंय. त्यांतील ३ जणांचा मृत्यूही झाला. या सर्वांमुळे ‘तबलिगी मरकज’वर टिकेची झोड उठू लागली आहे. मात्र आता गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी तबलिगी मरकजची बाजू घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

गुजरात मॉडेल कामाला लागलं आहे. हिंदू देशवासियांसाठी आवश्यक आरोग्य सेवा पुरवू न शकलेलं केंद्र सरकार आता तबलिगी मरकजवर कोरोना संसर्गाचं खापर फोडतंय. त्यातून या संकटाला धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करतंय. लाज वाटली पाहिजे सरकारला, असं मेवाणीने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *