Mon. May 10th, 2021

जिल्हा बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी शिवसेना, काँग्रेस आमदारासह 22 संचालकांवर गुन्हे दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील  8 कोटी 52 लाख रुपयांचा कर्जवाटप घोटाळा उघडकीस आला आहे.

 

या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांच्यासह 22 संचालक, तसेच बँकेचे अधिकारी-कर्मचारी आणि 22

सहकारी सोसायट्यांविरूद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

गुन्हा दाखल झालेले बहुतेक सर्व आरोपी हे राजकीय क्षेत्रातील आहेत. यामुळे त्यांना कायदेशीर नोटीसा पाठवून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

या कर्जवाटप घोटाळ्यामुळे सहकारक्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *