Mon. Dec 6th, 2021

..आता Jio च्या ग्राहकांची Free व्हॉईस कॉल सेवा बंद

सर्वात कमी पैशात सेवा देणाऱ्या जिओने आता त्याच्या वापरकर्त्यांना एक मोठा धक्का दिला आहे. जिओने फ्रि व्हॉईस कॉल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. सुरूवातीला फ्री असल्याने अनेकांनी Jio चं सिम कार्ड वापरण पसंत केलं आहे.

आता Jio सोडून  कोणत्याही नेटवर्कवर कॉल केल्यास प्रति मिनिट 6 पैसे शुल्क घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे शुल्क जिओ वापरकर्त्यांद्वारे इतर जिओ फोनवर केलेल्या कॉलवर आणि लँडलाईन फोनवर तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर केलेल्या कॉलवर लागू होणार नाही. सर्व नेटवर्ककडून येणारे कॉल विनामूल्य सुरू राहणार आहेत.” असे जिओने स्पष्ट केले आहे.

सुरूवातीला जिओ विनाशुल्क ग्राहकांना सेवा देत होते. त्यामुळे ग्राहकांचा तिकडे जास्त ओढा होता. याच कारणास्तव भारती एअरटेल आणि व्होडाफोन, आयडिया सारख्या अनेक कंपन्यांना Jio ने तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचे देणी दिली होती. त्यामुळे आता Jio सोडून  कोणत्याही नेटवर्कवर कॉल केल्यास प्रति मिनिट 6 पैसे शुल्क आकारण्यात येणार आहे.

ट्रायने आखलेल्या या धोरणामुळे Jio चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी Jio कंपनीने प्रतिस्पर्ध्याच्या नेटवर्कवर केलेल्या प्रत्येक कॉलसाठी ग्राहकांकडून प्रति मिनिट 6 पैसे घेण्याचे Jio ने ठरविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *