Fri. Jun 18th, 2021

Video: दिपाली सय्यद यांच्या उमेदवारीवर जितेंद्र आव्हाडांची वेगळ्या अंदाजात प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाडांनी  दिपाली सय्यद यांच्या उमेदवारीबाबत  वेगळ्याच अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसिध्द अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना  कळवा -मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल करत मुंब्रातील विकासासाठी येथून निवडणूक लढवत असल्याचं दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दिपाली सय्यद यांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाडांनी  दिपाली सय्यद यांच्या उमेदवारीबाबत  वेगळ्याच अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. बाबुल की दुवाये लेती जा हे गाणं म्हणत त्यांनी दिपाली सय्यद यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रीया नोंदवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *