Jaimaharashtra news

‘तर रक्तवाहिन्या भळाभळा वाहतील’, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेणारा ‘पळपुटे कोण?’ हा अग्रलेख ‘सामना’मध्ये छापून आला, आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. शिवसेनेच्या मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर निशाण साधल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत.

गेली 50 वर्षांपेक्षा जास्त काळ शरद पवार यांच्या भोवतीच फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं राजकारण फिरतंय.

यामुळे मुख्यमंत्री असतील, विरोधक असतील, बाळासाहेबांनंतरची पिढी असेल सर्वच जण शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत.

इतिहास काढायचा झाला तर आम्हालाही काढता येतो.

1977 चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल, पण जखमेवरची खपली काढायची नसते.

इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळाभळा वाहतील.

स्वाभिमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात.

शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता…

या शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘सामना’तील लेखावर टिका केली आहे.

Exit mobile version