Tue. Jul 27th, 2021

‘उदयनराजेंचे बालीश चाळे पाठीशी घालून काय मिळाले?’, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती थांबता थांबत नाहीय. राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यातच आज भाजपकडून राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

उदयनराजे भोसले यांनी राष्टट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतर अनेक स्तरांतून प्रतिक्रीया उमटल्या.

जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांचा संताप ट्विटरवरुन व्यक्त केलाय. मात्र ज्याप्रमाणे गणेश नाईक यांच्याविरोधात आव्हाड यांनी Tweet केलं, तसं न करता यावेळी शरद पवार यांनाच प्रश्न विचारलाय.


जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या व्टिटमध्ये शरद पवार यांना प्रश्न विचारलाय, ‘आपण उदयन राजेंना मुलासारखं सांभाळलं, त्यांचे बालीश चाळे सहन केले, पण एवढं करुन काय मिळालं’?

यापूर्वीही राष्ट्रवादीमधून कुणी पक्षांतर केल्यास खुद्द शरद पवार यांनी क्वचितच प्रतिक्रिया दिली. मात्र जितेंद्र आव्हाडच Twitter वरून व्यक्त होत असतात. यापूर्वीही सचिन अहीर, गणेश नाईक यांसारखी राष्ट्रवादीमधील मंडळी भाजपमध्ये गेल्यावर आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी Tweet करून शरद पवार यांना सवाल करत छ. उदयनराजे यांच्यावर टीका केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *