Wed. Jan 19th, 2022

आमच्या मनात जे आहे तेच राज ठाकरेंच्या ओठांवर – आव्हाड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या महिला मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते असा टोला लगावला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलत असताना राज ठाकरे यांच्या भाषणाचे समर्थन केले आहे. आमच्या मनात जे आहे ते राज ठाकरेंच्या ओठांवर आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे समर्थन केले.

यावेळी आमच्या मनात जे आहे तेच राज ठाकरेंच्या ओठांवर आहे.

तसेच जे राज ठाकरे यांनी पोपट, सुपारी घेऊन भाषण करणारे म्हणाले आहे तेच भाषणामुळे विचलीत झाले असल्याचे आव्हाड म्हणाले.

राज ठाकरे यांना बारामतीचा पोपट म्हणणारे मुख्यमंत्री विसरलेत की, राज ठाकरे यांनीच २०१४च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठराखण केली होती.

पवारांची करंगळी धरून राजकारणात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेकांना शरद पवारांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यांचे नावही वापरले जाते.

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर टोला ?

राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट सध्या बारामतीमझून येत असल्याचे त्यांनी ं म्हटलं.

राज ठाकरे हे फक्त कलाकार आहेत.

राज ठाकरे १२ वा खेळाडू ही नाहीत आणि नॉन प्लेयिंग कॅप्टनही नाहीत.

मनसेचा एकही आमदार, खासदार, नगरसेवकही निवडू आणता येत नाही.

त्यामुळे लोकांनी त्यांच्या भाषणाला दुर्लक्ष करावे असा मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला आहे.

शनिवारी मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी त्याचेच प्रत्युत्तर आज दिले असल्याचे समजते आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *