Sun. Jun 20th, 2021

UPSC शिवाय केंद्रात सरकारी नोकरीची संधी; पगार 1,00,000 च्या घरात!

देशभरातील लाखो युवा दरवर्षी UPSC च्या परीक्षांसाठी जीवतोड मेहनत करत असतात. ही परीक्षा पास होऊन केंद्रात सरकारी अधिकारी व्हायचं या मुलांचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा मेहनत आणि बुद्धिमत्ता असूनही UPSC परीक्षेत पास होता न आल्याने तरुणांची ही संधी हुकते. मात्र आता UPSC परीक्षा दिल्याशिवायही केंद्रात सरकारी अधिकारी बनण्याची संधी सरकारने देऊ केली आहे. पगार 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. नीती आयोगाचं सल्लागार अलोक कुमार यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

UPSC पास न करताही सरकारी अधिकारी?

नीती आयोगाने 44 जागांकरता अर्ज मागवले आहेत.

या अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर अर्जदारांच्या योग्यतेनुसार त्यांची निवड केली जाईल.

केंद्र सरकारकडूनच ही नियुक्ती होणार आहे.

ही नोकरी contract basis वर म्हणजेच कंत्राटी तत्वावर असेल.

साधारण 1 लाख 5 हजार पगार व्यक्तीला निवड झाल्यानंतर मिळणार आहे.

पात्रता?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अनुभवाचा विचार नोकरीसाठी केला जाईल.

शिक्षण हादेखील महत्वाचा criteria असेल.

अर्जदाराचं वय 26 ते 35 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.

कामाचं स्वरूप स्पष्ट करण्यात आलं नसलं, तरी विविध डिपार्टमेंट्समध्ये नियुक्ती होणार आहे. निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *