Fri. Sep 24th, 2021

बँकेत नोकरी हवी? SBI मध्ये 8000 जागांची भरती, वाचा नोंदणी प्रक्रिया

बँकेत नोकरी (jobs in Bank) करायचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मध्ये (SBI) तब्बल 8 हजार जागांसाठी भरती (job recruitment) होणार आहे. क्लर्क (clerk) पदांसाठी या जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया शुक्रवार पासून सुरू झाली आहे.

26 जानेवारी 2020 ही ऑनलाईन अर्ज (Online application) भरण्याची शेवटची तारीख आहे.

भरतीची पदं

कस्टमर सपोर्ट आणि सेल्स (Customer Support) विभाग – कनिष्ट सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे.

ऑनलाईन अर्ज कुठे कराल?

पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/carriers या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी (online registration) करता येईल. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येईल.

कोणकोणत्या राज्यात किती आहेत vacancies?

महाराष्ट्र – 865
उत्तर प्रदेश – 865
मध्य प्रदेश – 510
छत्तीसगढ – 90
दिल्ली – 145
राजस्थान – 500
बिहार – 230
झारखंड – 45

वय मर्यादा-

अर्जदाराचे वय 20 ते 28 असावे.

अर्जासाठी अपात्र-

2 जानेवारी 1992च्या आधी आणि 1 जानेवारी 2000 नंतर जन्मलेल्यांना अर्ज करता येणार नाही.

प्राथमिक परीक्षा-

भरतीची प्राथमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2020 दरम्यान होणार आहे.

मुख्य परीक्षा-

प्राथमिक परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 19 एप्रिल 2020 ला होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *