Thu. Sep 16th, 2021

नोकरीची सुवर्णसंधी : LIC मध्ये 8 हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती!

एकीकडे आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. मात्र त्याचवेळी एक दिलासादायक बातमीही आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. असिस्टंट क्लर्क पदासाठी मेगाभरती होत आहे.

24 वर्षांत पहिल्यांदाच पदभरती

गेल्या 24 वर्षांत पहिल्यांदाच LIC कडून नोकरीसाठी पदभरती करण्यात येत आहे.

8000 पदांसाठी ही मेगाभरती होणार आहे.

यासाठी Online अर्ज मागवण्यात आले आहेत.

‘असिस्टंट क्लार्क’ पदासाठी ही भरती आहे.

या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 अशी आहे. मागासवर्गीयांसाठी वयाची सवलत आहे.

शैक्षणिक पात्रता- इच्छुक उमेदवार कोणत्याही विषयातील किमान पदवीधर असावा

परीक्षेचं स्वरूप

परीक्षा दोन स्वरूपात होणार आहे.

पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.

पूर्व परीक्षेसाठी रिझनिंग अॅबिलिटी (Reasoning Ability), न्यूमरिकल अॅबिलिटी (Numerical Ability) आणि English हे तीन विषय आहेत.

ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे.

या परीक्षेत Multiple Answers Question स्वरूपाचे प्रश्न असतील.

कुठे आहे परीक्षा केंद्र?

महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर,  नागपूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या ठिकाणी परीक्षा होतील.

कसा कराल अर्ज?

इच्छुक उमेदवारांनी 1 ऑक्टोबर 2019 ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

त्यासाठी www.licindia.in/careers या website वर ऑनलाइन अर्ज करता येईल.

मराठी तरुणांसाठी ही मोठी संधी असून जास्तीत जास्त तरुणांनी याचा फायदा घ्यायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *