Wed. Aug 4th, 2021

नोकरीची संधी, MPSC कडून 240 पदांसाठी भरती!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) निरनिराळ्या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. वाहन निरीक्षक (AMVI) च्या 240 पदांची भरती होणार आहे. यासाठी 15 मार्च रोजी पूर्व परीक्षा होणार आहे.

जाणून घ्या पूर्व परीक्षेबद्दल-

15 मार्च 2020 AMVI च्या 240 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा होणार आहे.

हे पद प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात असतं.

पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान आणि बुद्धीमापन चाचणी, सद्य घडामोडी, अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग  या विषयांवर 100 मार्कांचे प्रश्न असतील.

100 मार्कांना 100 प्रश्न असून याची उत्तरं वस्तुनिष्ठ स्वरूपाचे (Multiple Choice Questions) असतील.

मराठी किंवा इंग्रजी भाषेत परीक्षा देता येईल.

शिक्षण-

या पदासाठी इंजिनिअरिंगचे डिप्लोमा आणि डिग्री आवश्यक आहे.

इंजिनिअरिंगची पदवी आणि पॉलिटेक्निक डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे.

कसा कराल अर्ज?

https://mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाईटवर 18 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2020 दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल.

12 जुलै 2020 रोजी मुख्य परीक्षा होईल. ही परीक्षा 300 मार्कांची असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *