Sat. Jun 12th, 2021

‘या’ सरकारी कंपनीत 1326 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

नोकरीच्या शोधात (Job vacancy) असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. कोल इंडिया (Coal India) या सरकारी खनिज कंपनीमध्ये 1326 पदांसाठी भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदासाठी इंजिनिअर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी फ्रेशर्स (Freshers) देखील चालणार आहेत. तुम्हाला या नोकरीमध्ये रस आहे का? इच्छुक असल्यास तुम्हाला पुढील प्रक्रिया पार पाडावी लागेल…

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज (Online application) भरावा लागणार आहे.

19 जानेवारी 2020 पर्यंत online application भरता येईल.

या पदासाठी 27 आणि 28 फेब्रुवारी 2020 रोजी परीक्षा होईल.

शैक्षणिक पात्रता

B.Sc (Engg.)/MCA,BE/B.Tech शिक्षण पूर्ण केलेलं असून त्यात त्यांना कमीत कमी 60% टक्के गुण मिळालेले असावेत.

CA/ICWA किंवा MBA केलं असल्यास त्या परीक्षेतही कमीत कमी 60% गुण हवे.

या शिवाय HR / PG डिप्लोमा, MHROD,MSW या शाखांमध्ये शिक्षण झालं असल्यास त्यातही निदान 60% अपेक्षित आहे.

SC/ST/PWD मध्ये मोडणाऱ्या इच्छुकांना 55% गुण चालणार आहेत.

वय-

इच्छुक अर्जदाराचं वय 1 एप्रिल 2020 पर्यंत 18 ते 30 वर्षं वयोगटाच्या आत असावं.

अर्जाची फी-

खुला प्रवर्ग, OBC तसंच EWS ला 1000 रुपये फी भरावी लागेल.

SC/ST/PWD वर्गातील अर्जदाकरांना कोणतीही फी नाही.

पदभरती कशी असेल?

मायनिंग – 288 जागा

इलेक्ट्रिकल – 218 जागा

मेकॅनिकल – 258 जागा

फायनान्स आणि अकाउंट्स – 254

पर्सोनेल आणि HR – 89

मार्केटिंग आणि सेल्स – 23

कम्युनिटी डेव्हलपमेंट – 26

सिव्हिल – 68

कोल प्रिपरेशन – 28

सिस्टम – 46

मटेरियल मॅनेजमेंट – 28

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *