Jaimaharashtra news

10 वी पास मुलांसाठी ISRO मध्ये कामाची संधी

‘चांद्रयान’ आणि ‘मंगळयान’ मोहिमांमुळे भारतीय तरुणांमध्ये ISRO संस्थेबद्दल अभिमान वाढला आहे. ISRO मध्ये काम करण्यासाठी आता अनेक तरुण उत्सुक असतात. मात्र त्यासाठी असणारी शिक्षणाची अट सर्वच पूर्ण करू शकत नाही. मात्र सध्या थेट 10वी पास मुलांसाठीही ISRO मध्ये संधी उपलब्ध होत आहे. ट्रेड अपरेंटिस या पदांसाठी ISRO मध्ये अर्ज मागवण्यात आले आहेत.

काय आहे यासाठी पात्रता?

शिक्षण- 10वी पास किंवा कोणत्याही ट्रेडमधून NTC बरोबर NCVT मधून ITI करणारे उमेदवार अर्ज करू शकतात

वय- कमाल वय 35 वर्षं

अर्जाची मुदत – 5 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2020

ग्रेड पे – 7,000 ते 7,668

या पदासाठी प्रवेश परीक्षा नसेल. मात्र गुणवत्ता आणि मुलाखतीवर नोकरी मिळणं अवलंबून असेल. ही पदं अहमदाबादमध्ये आहेत.

Exit mobile version