Thu. Jul 9th, 2020

गेल्या 3 वर्षात नव्या नोकऱ्यांचे प्रमाण 60 टक्क्यांनी घटल्याचे धक्कादायक वास्तव उघड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या 3 वर्षात नव्या नोकऱ्यांचे प्रमाण साठ टक्क्यांनी घटल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 

अर्थव्यवस्थेबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत रोजगार घटल्याची माहिती समोर आली.

 

अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 6 टक्क्यांची खाली आला. मात्र, अर्थतज्ज्ञांच्या मते, अर्थव्यवस्थेचा वेग घसरण्यामागे कोणतंही तांत्रिक कारण नाही.

 

रोजगाराचा घसरलेला वेग हे अर्थव्यवस्था घसरण्यामागंच प्रमुख कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं सत्तेवर आल्यानंतर दरवर्षी 2 कोटी रोजगारनिर्मिती करण्याची घोषणा केली होती.

 

मात्र, प्रत्यक्षात चित्र काही वेगळंच दिसत आहे. त्यामुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला. आता अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ठोस पावलं उचलायचं ठरवले आहे.

 

नव्या नोकऱ्यांचे घटते प्रमाण 

 

आर्थिक वर्ष    नव्या नोकऱ्या

2010          8.70 लाख

2011          9.29 लाख

2012          3.21 लाख

2013          4.21 लाख

2014          4.21 लाख

2015          1.35 लाख

2016          1.35 लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *